भजनी मालिका
← भजनांकडे परत

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे

uchchar phukacha nam hen viththal | nahin kanhi mol dravya venche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥ एका जनार्दनीं केला लागपाठ । तेणें सोपी वाट वैकुंठीची ॥३॥