भजनी मालिका
← भजनांकडे परत

उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई

uchchar namacha kari pan sachar | alas nirdharen takun dei

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥ तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥ यातना तें कांही न पडे व्यसन । नाम उच्चारण निवृत्तीचें ॥३॥ निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे भवकंद नामें तोचि ॥४॥ एका जनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन मी वाणी सदोदित ॥५॥