भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी

ubharuni brahma pahatase vat | pitambar nit sanvaruni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥ आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥ भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोन तेथें मनीं वास नाहीं ॥३॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती अंगणीं पढरीये ॥४॥ एका जनार्दनीं महा लाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥