भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही करा कृपादान। येइन धाऊन पायापें

tumhi kara krupadan| yein dhaun payapen

रचनाकार: संत सेना · अभंग
तुम्ही करा कृपादान। येइन धाऊन पायापें ॥१॥ घेईन संतांची भेटी। सांगेन सूखाचिये गोष्टी ॥२॥ जैसे माते पार्शी बाळ। सांगे जीवी, सकळ ॥३॥ सेना म्हणे हरे ताप । मायबाप देखुनी ॥४॥