भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा

tumachen nam athavitan | dhani na pure pandharinatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐसा एक घडी ॥२॥ निजध्यास जडतां नामीं । सुखें सुख दुणावें प्रेमीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । शेष्ठा धामांचे हें धाम ॥४॥