भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें

tumache payin thevitan bhal | pavalon sakal antarichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें ॥१॥ आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥ जन्माचें सार्थक । पाहतां तुमचें श्रीमुख ॥३॥ शरण एका जनार्दनीं । धन्य नाम तुमचें वदनीं ॥४॥