भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जीवित्व माझें

tumache apraman hotan bol | mag phol jivitva majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जीवित्व माझें ॥१॥ कासया वागवुं सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥२॥ तुमचा बोल व्हावा निका । हेंचि देखा मज प्रिय ॥३॥ मज यावें उणेपण । तुमचें थोरपण प्रकाशुं द्या ॥४॥ एका जनार्दनीं देव । स्वयमेव बोलती ॥५॥