भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या चरणापरतें । शरण जाऊं आणिकातें

tujhya charanaparaten | sharan jaun anikaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुझ्या चरणापरतें । शरण जाऊं आणिकातें ॥१॥ काया वाच आणि मन । रिघाली शरण तुमची ॥२॥ निवारुनि भवताप । त्रिविध तापें तो संताप ॥३॥ एका जनार्दनीं चित्तें । शरण आला न करा परतें ॥४॥