भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना

tujhiya krupechen posanen mi din | karin tun jatan janardana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना ॥१॥ अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥ कदा नुपेक्षिसी आलिया शरण । हें मागोनी महिमान चालत आलें ॥३॥ एका जानार्दनीं कॄपेचा वोरस । करी जगदीश मजवरी ॥४॥