भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें

tuj te sarva ahe thaven | ghyaven tyachen budavaven

तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनी । पाहा विचारोनी । आढी धरोनी काम नाहीं ॥२॥ अवघे राहिले प्रकार । झालों जिवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥३॥ आतां निदसूर नसावे । गांठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्त्व आपुलें ॥४॥