भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज सांगतसे मना । पाहें पंढरीचा राणा

tuj sangatase mana | pahen pandharicha rana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुज सांगतसे मना । पाहें पंढरीचा राणा ॥१॥ नको दुजा छंद कांहीं । राहें विठ्ठलाचे पायीं ॥२॥ विषयीक वासना । सोडी सोडी सत्य जाणा ॥३॥ जेणें घडे सर्व सांग । फिटे संसाराचा पांग ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ उपाव नेटका ॥५॥