भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट

tuj aisen vate deh vyartha java | dyutakarma khelava saripat

रचनाकार: संत सेना · अभंग
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥ मग नाहीं नाम निजल्य जागा राम। जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥ दासीगमनीं धीट विषयीं लंपट । जावया वाट अधोगती ॥३॥ नर्का जावयासी धरसील चाड । तरी निंदा गोड वैष्णवांची ॥४॥ सेना म्हणे नामाचें लावीं करि पिसें । जन्माल्या सायासें व्यर्थ जासी ॥५॥