भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप

tryambak shikharin jivanmukta tumhi | nathache te dhamin guptarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥ सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥ अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळां आड कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणावा आपुला । आसनीं शयनीं त्याला विसरुं नका ॥४॥