भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणें

tirthatan guhavas | sharira nash na karanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणें ॥१॥ समागम संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥ करितां रामनाम लाहो । घडती पाहाहो धर्म त्या ॥३॥ सकळ कर्में जाती वायां । संतपायां देखतां ॥४॥ एका जनार्दनीं होतां दास । पुरे आस सर्वही ॥५॥