भजनी मालिका
← भजनांकडे परत

थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु

thurakat thurakat chalatu | radhikeche galan mithi ghalitu |tayesi chumban avadi detu | pahatan yashodesi mag radatu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥ राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे ।हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥ कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥ यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं ।एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥