भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या

thor anyayi dayaghana | sambhalin dina apulya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या ॥१॥ वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥ कुर्वडीन आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । न करी उदास तयासी ॥४॥