भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेचि एक संत जाणा। आवडती नारायणा

techi ek sant jana| avadati narayana

रचनाकार: संत सेना · अभंग
तेचि एक संत जाणा। आवडती नारायणा ॥१॥ पांडुरंगा वांचोनि कांहीं। न जाणे दुसरे पाही॥२॥ मुखीं नाम अमृतवाणी। धाले मनीं डुल्लती ॥३॥ सेना म्हणे पायीं माथां। त्यांच्या ठेवियला आतां ॥४॥