भजनी मालिका
← भजनांकडे परत

तवं त्या करिती शंखस्फूरण । दीर्धवरें आक्रदन । तें ऐकांनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले

tavan tya kariti shankhasphuran | dirdhavaren akradan | ten aikanniyan nagarik jan | hahabhut vorasale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तवं त्या करिती शंखस्फूरण । दीर्धवरें आक्रदन । तें ऐकांनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥ तयांते पुसता त्य म्हणती । दु:खर्णवी पडिलों हो भूपती । सांगता पुतनेची गती । मूच्छित पडती धरणीये ॥२॥ म्हणती जातांचिं गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंद यशोदे घरी । उभयतां येऊनियां सामोरी । बहुत सन्माने गौरविले ॥३॥ विडे उपचार भोजन । पूतनाईतें तोषवून । मग आणिलें राजीवनयन । बाळ तान्हुले दाखविती ॥४॥ तंव तें घन:श्याम सांवळे । राजीवाक्ष राप रेखिलें । बाळलेणें विराजलें । नयनचि गोविलें देखतां ॥५॥ मग ते घेऊनियां जवळी । सतनीं लावितांचि तात्काळीं । सुरासुरा शोषुनियां वेल्हाळी । न सोडी जिवें प्राण जाता ॥६॥ निळा म्हणे त्या सोडविता । न सुटे पूतना आक्रंदतां । आम्हीही स्वशक्ती ओढितां । हरिलें तत्वतां प्राण तिचे ॥७॥