भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां

tari ka majha kela angikar | atan vichar karisi vayan

रचनाकार: संत सेना · अभंग
तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥१॥ तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥ आमुचें तें आम्ही केलेंसे जतन । अंतर तुम्हांकूण न पडावा ॥३॥ समर्थाचे असे वचन प्रमाण। शरणागता जाण जतन जीवी ॥४॥ तुझा म्हणविलों सांभाळी जी आतां । न घे अपेश माथा सेना म्हणे ॥५॥