भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरलें तों असंख्यात । सांगो जातां न लागे अंत

taralen ton asankhyat | sango jatan na lage ant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तरलें तों असंख्यात । सांगो जातां न लागे अंत ॥१॥ एका हरीच्या नामासाठीं । भरल्या विमानांच्या कोटी ॥२॥ नाना याति स्त्रिया पुरुष । वनचर श्वापदादी राक्षस ॥३॥ निळा म्हणे कीटक पंतग । पावले नामें पद अभंग ॥४॥