भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळां भुकेची झाली वेळ । मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरुतरु शीतळ छायातळीं

tanv patala madhyanhakal | govalan bhukechi jhali vel | mag pahoniyan uttam sthal | surutaru shital chhayatalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळां भुकेची झाली वेळ । मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरुतरु शीतळ छायातळीं ॥१॥ तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालूनियां खलती । कृष्ण म्हणे गाडियांपगती । शिदोया एकत्र कालवूं ॥२॥ गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निजकरें । होईल अमृतचि तें दुसरें । जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥ नारदें ते ऐकिलें कानीं । सांगे सत्यलोका जाउनी । ब्रम्हयातें म्हणें चक्रपाणी आजि ब्रम्हरस वांटितो ॥४॥ देवा जाऊनियां तेथें । शेष घ्यावेंजी कृष्णहातें । तरी हें पद राहेल निरुतें । नाही तरी अल्पायु ॥५॥ कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरुपमा । पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥ निळा म्हणे नारदवचनीं । ब्रम्हदेव चािलिले तेथुनी । पाहाती तंव वृंदावनीं । गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥