भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी

talamrudang mohari | naubad vaje nanapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥ घण घणाणा घंटा वाजे । घण घणाना घंटा वाजे ॥२॥ उपासना याचे पायीं । अवघी माझी विठाबाई ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा माझा पंढरीराव ॥४॥