भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्गासुख आम्ही मानुं जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें

svargasukh amhi manun jaisa ok | sanduniyan sukh pandharichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वर्गासुख आम्ही मानुं जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें ॥१॥ पंढरीं पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥ मध्यस्थळीं राहे पुंडलीक मुनी । तयाचे दरुशनी पातक हरे ॥३॥ दोनी कर कटीं उभा जगजेठी । एका जनार्दनीं भेटी सुख होय ॥४॥