भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं

svarga jayachi payari | moksha jyancha adnyadharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिवब्रह्मा ॥२॥ ब्रह्माज्ञानाची ती मात । कोण तया तेथें पुसत ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणी शरण एका जनार्दनीं ॥४॥