भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे

svapnen dise svayenchi nase | taisen kalpanik jag bhase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे ॥१॥ मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं नसे शीतळ जळ ॥२॥ पिंपळावरुनी मार्गु आहे । ऐकोनी वृक्षा वेघों जाये ॥३॥ ऐसेंक अभागीं पामर । नकळे तयांसी विचार ॥४॥ म्हनॊनि शरण जनार्दनी । एका जनार्दनीं एकपणीं ॥५॥