भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा

svapnamajin aniruddhen dekhilise ukha | tayalagin gheuni geli chitrarekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥ तया सोडविण्या हरी । धांव घेतसे झडकरी ॥२॥ पाहे स्वप्नाचेनि कांतें । अनिरुद्धा केलेसे निरुतें ॥३॥ स्वप्नेंचि देखे सारा । एका जनार्दनीं पसारा ॥४॥