भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा

svagotra paragotra yancha bharanvasa | manun naye sahasa are mudha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा ॥१॥ वेदींचें वचन वेदीं तें प्रमाण । एक नारायण सार जप ॥२॥ शास्त्रांचा प्रभाव शास्त्रिकांसी ठावा । उघड जपावा राममंत्र ॥३॥ न करी आळस नको पडों भरीं । एका जनार्दनीं हरी स्मरे देहीं ॥४॥