भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुरवर इच्छा करिती त्यांची । नित्य हरिभक्तांची भेटावया

suravar ichchha kariti tyanchi | nitya haribhaktanchi bhetavaya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुरवर इच्छा करिती त्यांची । नित्य हरिभक्तांची भेटावया ॥१॥ म्हणती धन्य हरीचे दास । सर्वदा उदास देहभावीं ॥२॥ दर्शनें यांच्या सर्वही सिध्दी । तुटती उपाधी जन्ममरणें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । रंगला प्रेमासी यांचिया ॥४॥