भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं

surakandi baisoni khodin chadhasi jhadavari | modaliya dahali khandi padashil aghorin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥ वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥ जगडवाळ झाड वरी खांदयाहि वांकुडया । उलंडल्या वरुनि हात मोडतील मांडया ॥३॥ निळा म्हणे श्रीहरी ते दृष्टी धरुनियां । वेंघे वरी जाई दुरी न पवसी अपाया ॥४॥