भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण । गातां तुमचे गुण धन्य झाला

suradas andhala panjabi bramhan | gatan tumache gun dhanya jhala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण । गातां तुमचे गुण धन्य झाला ॥१॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । नरहारी सोनार पाठक नामा ॥२॥ जिवलग तुम्हां सांगाती जीवाचे । विभागी भाग्याचे केले तुम्हीं ॥३॥ निळा म्हणे भेद नाहीं तुम्हां संतां । दाविली भिन्नता प्रीतीसाठीं ॥४॥