भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुनाकुमरी आमुचे घरीं । त्यांतेही चाळवुनियां निर्धारी । लोळे सेजाबाजावरी । आणखीही करी काय नेणों

sunakumari amuche gharin | tyantehi chalavuniyan nirdhari | lole sejabajavari | anakhihi kari kay nenon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुनाकुमरी आमुचे घरीं । त्यांतेही चाळवुनियां निर्धारी । लोळे सेजाबाजावरी । आणखीही करी काय नेणों ॥१॥ तया नावडतिचि भ्रतार । सासासासरे भावेदिर । करुनिया यासिची परिचार । रतल्या निरंतर याची संगें ॥२॥ खाता जेवितां स्मरति यातें । लेतां नेसतां यापेंचि चित्तें । कामकाजीं जैसि भ्रमितें । तैसिया उदास वर्तती ॥३॥ यशोदा याणेंचि लाविला चाळा । वेडयाचि केल्या सुनाबाळा । देखता याचिया श्रीमुखकमळा । मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥४॥ ऐसा चोर हा शिनळ । यशोदे आवरी आपुला बाळ । येणें बुडविलें आमुचे कुळ । न कळे आकळ खेळयाच ॥५॥ सांगता हे ऐशी गोष्टी । क्रोधची उपजे तुझया पोटीं । परीहा भला नव्हेचि शेवटीं । उभ्यकुलां बुडवणा ॥६॥ निळा म्हणे त्यांचि वचनें । ऐकोनि यशोदा क्रोधें म्हणे । काय गे बोल त्या माझें तान्हें । बाळक हें नेणें चोया करुं ॥७॥