भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकुमार सुंदर

sukumar sundar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुकुमार सुंदर । अंगकांति मनोहर ॥१॥ विठो घननीळ सांवळा । लावण्यें मदनाचा पुतळा ॥२॥ कसीयेला पीतांबर । चरणीं ब्रीदाचा तोडर ॥३॥ निळा म्हणे माळा कंठी । मुगुटीं मोरविसावेटी ॥४॥