भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं

sukhen ghalin janmasi | henchi baren ki manasin

रचनाकार: संत सेना · अभंग
सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं ॥१॥ वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥२॥ हरिदासाची करीन सेवा । तेणे सुख थोर जीवा ॥३॥ सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥४॥