भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखे सेऊं ब्रह्मानंदा

sukhe seun brahmananda

सुखे सेऊं ब्रह्मानंदा। गाऊं रामनाम सदा। नोहे मग बाधा। काळदूत यमाची ।।१।। करूं वासुदेव स्मरण। तेणे तुटे रे बंधन । खंडेल कर्माचे वदन । वासुदेव जपताची ।। धृ० ।। तीर्थयात्रे सुखें जाऊं। वाचे विठ्ठलनाम घेऊ। संतासंगे सेऊ। वासुदेव धणीवरी ।।३।। लोभममता दवडूं आशा। उदर व्यथेचा वोळसा । न करूं आणिक सायासा। वासुदेवावांचूनि ।।४।। मुख्य वर्माचे हे वर्म। येणे साधे सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ।।५।।