भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुसी शरण होतां करिती जे विघ्न

gurusi sharan hotan kariti je vighna

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
गुरुसी शरण होतां करिती जे विघ्न । पाचती तेदरुण नरकी शेखी ॥१॥ घडती कोटी मात्रा अगम्या गमन । गोवघ भक्षण गोमासंदि ॥२॥ कोटी ब्रम्हहत्या पातकें अशेष । घदती तया दोष ब्रह्माडीचे ॥३॥ होय दग्ध पुण्य जन्मीचें अनंत । जाती नरकी नित्य कुळांसह ॥४॥ नोहे त्या सुटका मग होकां कोणी । बोधावें म्हणोनी संती जना ॥५॥ विसरोनि सुख करावें पर्यटण । लावावें वळवोन विश्व मार्गा ॥६॥ झटावें अक्षय जगाच्या कल्याणा । उपदेशावें जना नारी नरा ॥७॥ ओळखावें देही सकळी आत्मघन । होवोनि शरण योगियासी ॥८॥ आलीया करावी सत्य शरण कृपा । सकळं ह सोपा राजमार्ग ॥९॥ नसतां पुरुषां योगी अनुराग । द्यावा मंत्र योग स्त्रियांशुद्रां ॥१०॥ जरी नोह योग अभ्यास साधन । तरी सेवा क्षण सोडों नये ॥११॥ सोशिती काबाड प्रपंच प्रहर आठ । मानिती अघम कष्ट गुरुसेवे ॥१२॥ आचारिती दोष पातकें अगाध । गुरुसेवे खेद पचती नरकीं ॥१३॥ नव्हे शिष्य जंव नोहे समर्पण । पतन गुरुवीण जन्म वायां ॥१४॥ खंडलिया पळ निमिष गुरुसेवा । अंतरे तो देवा कल्पवरी ॥१५॥ माता पिता गोत्र कांता पती पुत्र । भोगिती अघोर पुर्वजेंशी ॥१६॥ नोहे त्या सुटका मग कल्पातीही । जाये कृपा तोही मंत्र वायां ॥१७॥ यालागी करावी नित्य गुरु सेवा । देह जीव मावा आर्पोनिया ॥१८॥ करी सेवा नित्य न करी योगाभ्यास । लाभे अंती त्यास ब्रह्मपद ॥१९॥ नेणोनि सुरनर प्रेमे ब्रह्मभावें । क्षणोक्षणीं आलिंगावें अर्पावा देह ॥२०॥ बैसोनि सन्निध एकांती बाजारी । करावी नीच बारी निर्लज्जेशी ॥२१॥ म्हणे जनार्दन उत्तरी कसवटाई । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥२२॥