भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय

sukhakar murti rup rekhevin | ubha ase vyapun brahmandi ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय ॥१॥ वेधला जीऊ तयाचिया गुणा । क्षणभरी न बिसंबे दिवकीनंदना ॥२॥ सकळ विश्रांती घर चंद्रभागा तीर । एका जनार्दनीं मनोहर गोमटें गे माय ॥३॥