भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख दुःख समान सकल जीवांचा कृपाळ

sukh duhkh saman sakal jivancha krupal

सुख दुःख समान सकल जीवांचा कृपाळ । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ।।१।। धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ।।२।। विषयी विरक्त जया नाही आपपर । संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ।।३।। जाणीव शहाणीव ओझें सांडोनिया दरी। आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ।।४।। एका जनार्दनी नित्य हरीचें कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन ।।५।।