भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तींचा

sukal jhala narinaran | characharan muktincha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तींचा ॥१॥ विठोबाच्या दर्शनमात्रें । ऐकतां श्रोतें गुण त्याचे ॥२॥ नित्य नवाचि उत्साह वाटे । ह्रदयीं न संडे आनंद तो ॥३॥ निळा म्हणे जगदोध्दारा । उपाय बरा योजिला हा ॥४॥