भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे

sparsha karal majasi tari vithobachi an | aikatanchi vachan magen फ़ire

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे ॥१॥ जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥ ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥ एका जनार्दनीं चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥