भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला

sopa vruksha phalasi ala | viththalanamen vistarala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥ वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥ पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं । निवांत होऊनियां ठेली ॥३॥ मूळ वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥