भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी

sopa mantra dvadash aksharin | vache jape tun nirdharin | antakalin hari | na vinsabe tujasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥ धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥ मन करीं गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनीं वाट । सोपी मग सहजची ॥३॥