भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं

sonvalaya nanv kshirasagar | vruthachi manjar gajarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥ काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥ शुभा नांवे विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥३॥ निळा म्हणे पाखांड करिती । जगीं म्हणविती गोसावी ॥४॥