भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें

soniyancha dev soniyachen deul | soniyancha bhakta puji soniyachya kamalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥ नामची पैं रूप तें अभिन्न । जगीं जनार्दन तोचि पाहे ॥२॥ मृत्तिकेचा घट मृत्तिकेची वेळणी । मृत्तिकेचें आळें तेथें मृत्तिकेची माथणी ॥३॥ भिन्न भिन्नाकारीं मृत्तिका दिसते. साकार । एका जनार्दनीं निज निर्विकार ॥४॥