भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय

sonen ase sonepanen | alankar lenen hoy jay

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय ॥१॥ तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥२॥ नाना मृगजळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडीच ॥३॥ निळा म्हणे घटमठ मोडी । अवकाश परवडी नाहीं तया ॥४॥