भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव

siddhi sadhak jaya hrudayin dhyati | to gopikecha pati viththalarav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥ जीवांचें जीवन मनांचे उन्मन । चैतन्यघन पूर्ण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं आनंद अद्वय । न कळें त्यांची सोय ब्रह्मादिकां ॥४॥