भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान । आम्हां जोडलें वो न करितां साधन । सहजचि पाचारितां येतसे धांवोन । प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो

shukadikachiye hradayin dhyan | amhan jodalen vo na karitan sadhan | sahajachi pacharitan yetase dhanvon | premen alingitan niven tanu man vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान । आम्हां जोडलें वो न करितां साधन । सहजचि पाचारितां येतसे धांवोन । प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो ॥१॥ ऐशा गौळणी आनंद भरितां । दृष्टीं अवलोकूनि मदनचिया ताता । म्हणती धन्या भाग्य आमुचें वो आतां । लाधलों जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥ नित्य हरीचिया समागमें बाई । नाहीं देखिलें तें सुख भोगूं देहीं । प्रारब्ध संचित क्रियमाण तेंही । गेलें हारपोनिया ॥ ठांईचें ठांई वो ॥३॥ येतां जातां नेणों काळाचा आडदरा । देखतां सन्मुख तो पळतुसे माघारा । रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा । तेणें वाहातात जन्मदु:ख जीर वो ॥४॥ हरीचे सन्निधीं वो सहवासें वर्ततां । यासि बोलतां चालतां कृष्ण खेळतां । आंगी ऐश्वर्याचा दृढावली सत्ता । तेणें अजरामर झालों असों निभ्रांता वों ॥५॥ ऐशा कृष्णरुपीं रुपसा बाळा । होऊनि स्तविती पूजिती वेळोवेळां । कडिये खांदिये घेऊनि घननीळा । निळया स्वामीतें अवलोकिती डोळां वो ॥६॥