भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली

shrikrushna sanduni jatanchi duri | vasudevaten dain‍ya avadasa vari | mag devakijavali detan te kumari | mahaakroshen garjinnali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥ ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायते म्हणत । जन्मला सुत देवकिये ॥२॥ महाकाळ कृतांत ऐसा । गर्जे ब्रम्हांड कोंदल्या दिशा । राज म्हणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥ घेऊनियां मग निशाचरभारा । आला बंदिशाळे सत्वरा । सावध करिताती येरयेरां । म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥ भयभीत देवकींते हाकारी । म्हणे आठवा आणि वो बाहेरी । येरी करुणा भाकूनियां भारी । विनवि येवडे तरी वाचवा ॥५॥ ऐसे बोलोनियां सुंदरी । आणोनि दिधली कौसा करी । येरु पाहे तव तव कुमारी । म्हणे आठवा लपविला ॥६॥ तोहि आणेनियां देई । येरी म्हणे दुसरें नाही । झाडा घेऊनियां पाहीं । आण तुझीचि वाहतसें ॥७॥ येरु म्हणे ईतें सोडूं । मग तयाचाहि सूड काढू । निळा म्हणे गर्वारुढू । नेणे मदांध हरि महिमा ॥८॥