भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनीं विटेवरी

shrigurusarakha vandya nahin tribhuvanin | to kaivalyacha dhanin vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनीं विटेवरी ॥१॥ विटेवरी उभा आनंदें राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथें ॥२॥ आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं । नाम आनंदेसी गाऊं गीती ॥३॥ एका जनार्दनीं कैवल्याचा धनी । तो नंदाचें अंगणीं खेळे लीला ॥४॥