भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला

shridnyanarajen kela upakar | marga ha nirdhar dakhavila

रचनाकार: संत सेना · अभंग
श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥ विटेवरी उभा वैकुंठनायक। आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥ अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ॥३॥ सेना म्हणे चला जाऊं तया ठाया। पांडुरंग सखया भेटावया ॥४॥