भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां

shivanam uchchari | alas na kari kshanabhari | mahapapa hoy bohari | nam ghetan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥ शिव शिव नाम । जपे कां रे उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥ दो अक्षरीं काम । वाचे घेई तूं नाम । आणीक तें वर्म । सोपे नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं । शिव जप ध्यानीं मनीं । वेद शास्त्र पुराणीं । बोलियेलें ॥४॥